न्यूयॉर्क – अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड होऊ देउ नका, अशी अपेक्षा जगातील सर्व प्रमुख देशांच्या नेत्यांनी आपल्याकडे व्यक्त केली आहे, असे अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.
अध्यक्षपदी फेरनिवड होण्यासाठी जोरदार भूमिका त्यांनी मांडली. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यास लोकशाही धोक्यात येईल, असे वाटल्यामुळे भारतात झालेल्या जी-२० परिषदेच्यावेळी देखील जागतिक पातळीवरील अनेक नेत्यांनी आपल्याकडे ही अपेक्षा व्यक्त केली होती, असेही बायडेन म्हणाले.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि बिल क्लिंटन यांनी देखील गुरुवारी झालेल्या निधी संकलनाच्या बायडेन यांना पाठिंबा जाहीर केला. ट्रम्प यांची फेरनिवड झाल्यास रक्तपात होईल. त्यांचा पराभव व्हायलाच हवा, असे बायडेन म्हणाले. अनेक महत्वाच्या करारांबरोबर नाटोमधून बाहेर पडल्याबद्दलही बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली.
देशाच्या राजकीय व्यवस्थेत राजकीय हिंसेला कधीही स्थान नाही, असे डेमोक्रॅट्स, अपक्ष आणि रिपब्लिकन यांच्यासह सर्व अमेरिकन लोकांनी सांगायला हवे. आपण विशेष आहोत म्हणून नव्हे, तर आपण म्हणजे ट्रम्प नाही, म्हणून आपल्याला मतदान करावे, असे आवाहन देखील बायडेन यांनी केले.