कोलकात्यातील रवींद्र सरोवराच्या पूजेला हरित लवादाकडून प्रतिबंध

कोलकाता : शहरातील प्रसिद्धरवींद्र सरोवर तलावाची पूजा करण्यास हरित लवादाने मज्जाव केल आहे. पूजा अर्चा किंवा इतर कोणत्याही उत्सवांमुळे प्रदूषण होत असल्याच्या कारणास्तव राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे. त्यामुळे या सरोवराचे दरवाजे छट पूजेसाठी बंद करण्यात येणार आहेत, असे केएमडीएच्या एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.

मागील वर्षी हजारो भाविकांनी रवींद्र सरोबार तलावात उतरून छट पूजा केली होती. रवींद्र सरोबारचे सर्व 15 दरवाजे 2 आणि 3 नोव्हेंबरला होणाऱ्या छट पूजेच्या दिवशी बंद असतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

रवींद्र सरोबारमधील छट पूजा किंवा अन्य धार्मिक उत्सवांसह अन्य कोणत्याही धार्मिक विधीवर एनजीटीने 14 ऑक्‍टोबरला बंदी घालण्याचे निर्देश दिले. दरम्यान, पर्यावरणवादी सुमिता बंड्योपाध्याय यांनी केएमडीएच्या पुढाकाराचे स्वागत केले. गेल्या वर्षी छट पूजा करणाऱ्यांनी रवींद्र सरोबार तलावात घुसखोरी केल्याने 2017 च्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.