Nikki Haley – निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनुपस्थित असलेल्या पतीबद्दल प्रश्न विचारल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेले या माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चांगल्याच भडकल्या. जे काही बोलायचे असेल ते माझ्या तोंडावर बोला, असे त्यांनी ट्रम्प यांना सुनावले आहे.
रिपब्लिकन पक्षाची साऊथ कॅरोलिनामधील प्राथमिक फेरी २४ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी प्रचार करताना ट्रम्प यांनी हेले यांचे पती कोठे आहेत.? असा प्रश्न उपस्थित केला होता. ते कोठे आहेत? ते निघून गेले, कारण त्यांना माहिती आहे, अशी शब्दात ट्रम्प यांनी हेले यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल टिप्पणी केली होती.
त्यावर हेले यांनी सोशल मीडियावरून ट्रम्प यांना उत्तर दिले आहे. मायकेल (हेले यांचे पती) देशाची सेवा करण्यासाठी तैनात आहेत. असे काम कदाचित तुम्हाला त्याबद्दल काहीही माहिती नसावे, असे हेले यांनी म्हटले आहे. आपल्या पतीबद्दल जे काही बोलायचे असेल, ते तोंडावर बोलावे, असे आव्हानही हेले यांनी ट्रम्प यांना दिले.
हेले यांचे पती सध्या नॅशनल गार्ड मिशनसाठी परदेशात तैनात आहेत. या मिशनच्या माध्यमातून हॉर्न ऋफ आफ्रिकेत सुरक्षा पुरवली जाते. त्यांनीही ट्रम्प यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर लांडग्याचा फोटो पोस्ट केला आहे.
माणूस आणि प्राणी यांच्यात काय फरक असतो? प्राणी कधीही मूर्ख लोकांना नेतृत्व करू देत नाहीत, असे त्यांनी या फोटो बरोबरच्या पोस्टममध्ये म्हटले आहे.