बारामती – अफजल बनीमिया आत्तार (वय 39 रा.श्रीरामनगर) चंद्रकुमार जयमंगल शहा (वय 38 रा.सुर्यनगरी ता.बारामती) अक्षय चंद्रकांत शहा (वय 32 रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती) यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. बारामती तालुक्यात विविध ठिकाणी लॉक डाऊन चे पालन (विनाकारण मोटरसाइकल वर फिरने दुकानदाराने सूचनांचे पालन न करणे) न केल्याबाबत बऱ्याच जणांवर गुन्हे दाखल केले होते.
ही शिक्षा थोडी किंवा छोटी वाटत असली तरी या व्यक्तीवर भविष्यकाळात चारित्र्य पडताळणी मध्ये शिक्षा झाली म्हणून कोणतीही शासकीय किंवा खाजगी नोकरी मिळणार नाही. त्याचबरोबर भविष्यकाळात पासपोर्ट, शस्त्र परवाना , व्यवसाय परवाने मिळताना मोठी अड़चन निर्माण होणार आहे.
आपल्या थोड्या चुकीमुळे आपले स्वतःचे भविष्य अंधारात टाकणारे हे पाऊल आहे .त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या स्वतःच्या घरात बसून गंभीरपणाने लॉक डाऊन चे पालन करणे आवश्यक असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले.