Baramati Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच बारामती लोकसभा मतदार संघातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चात आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील शॅडो रजिस्ट्रर खर्चात तफावत आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडून ही नोटिस बजावण्यात आली आहे.
पुढच्या 48 तासांत खुलासा करण्याच्या सूचना Baramati Lok Sabha Election 2024|
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीची सगळी माहिती देणं आवश्यक असतं. मात्र उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चात आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील शॅडो रजिस्ट्रर खर्चात तफावत आढळली आहे. याप्रकरणी त्यांना नोटिस बजावण्यात आली असून ही तफावत आढळण्यामागचे कारण काय? याबाबत पुढच्या 48 तासांत खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांचा 28 एप्रिलपर्यंतचा 37 लाख 23 हजार 610 रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र, उमेदवारांच्या खर्च प्रतिनिधीने दाखविलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केली. त्यावेळी त्यात 1 लाख तीन हजार 449 रुपयांची तफावत आढळल्याचे नोटीसमध्ये उल्लेख आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनीही नोटीस बजावण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांचा 28 एप्रिलपर्यंतचा खर्च 29 लाख 93 हजार 31 रुपये इतका आहे. उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील रजिस्टरशी तुलना केल्यावर त्यात 9 लाख 10 हजार 901 रुपयांची तफावत आढळली. यामुळे सुनेत्रा पवार यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
नोटीसीत काय म्हंटले? Baramati Lok Sabha Election 2024|
उमेदवारांनी नोटीसीला उत्तर न दिल्यास खर्चातील तफावत दोन्ही उमेदवारांना मान्य असल्याचे समजले जाणार असल्याचे यात सांगण्यात आले आहे. तर नोटीसीवर आक्षेप असल्यास उमेदवारांना जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार आहे, असंही नोटीसीत म्हटलं आहे.
दरम्यान, बारामती मतदारसंघातून 38 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात होणार आहे. नणंद -भावजय यांच्यात होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: