पेट्रोल पंपावर अनेकदा मोबाईल बंद अशा सूचना आपण बघतो, अनेकदा पेट्रोल पंपावर मोबाईल वापरू नये असे कित्येकदा सांगण्यात येते. मात्र पेट्रोल पंपावर मोबाईल वापरल्यामुळे आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मिळलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नागपुर येथील पेट्रोल पंपावरील आहे. साधारण 30 सेकंदांची व्हिडिओ क्लिप पेट्रोल पंपावर आपल्या बाइकमध्ये इंधन भरण्यासाठी थांबलेल्या वाहनचालकांनी सुरू होते. व्हिडिओमध्ये पुढे दिसते की, पेट्रोल पंपाचा एक कर्मचारी एका दुचाकीमध्ये इंधन भरत आहे व त्यावेळी वाहन चालकाला एक कॉल येतो. दुचाकीचालक कॉल घ्यायला जातो इतक्यात गाडीला मोठी आग लागते. अचानक लागलेल्या या आगीमुळे दुचाकीचालक व त्याच्यासोबत असलेली व्यक्ती गाडीवरून खाली उतरतात. त्यानंतर काही वेळातच पेट्रोल पंपावरील कर्मचारी ही आग आटोक्यात आणतात.