तळेगाव दाभाडे – इंदोरी जवळील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा या ठिकाणी वर्षाविहारासाठी आलेल्या महाविद्यालयीन युवकांपैकी दोघेजण इंद्रायणी नदी बुडाले. अनिकेत वर्मा (वय 17) व अशोक गुलाब चव्हाण (वय 17, रा. चिंचवड) असे नदीत बुडालेल्या युवकांची नावे आहे.त्यापैकी अनिकेत वर्मा याचा मृतदेह गुरुवारी (दि.23) सायंकाळी सापडला आहे. तर अशोक चव्हाण याचा शोध दुसऱ्यादिवशीही सुरूच आहे.
तळेगाव दाभाडे ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवार( दि.24) रोजी सकाळी चिंचवड येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा ज्युनियर कॉलेजमधील 8 ते 9 मित्र वर्षा विहाराचा आनंद लुटण्यासाठी कुंडमळा येथे आले होते. हे सर्व जण लोकलने बेगडेवाडी येथे उतरले. त्यानंतर ते कुंडमळा येथे आले.
पाण्यात उतरलेल्या चार जणांपैकी अनिकेत वर्मा व अशोक चव्हाण यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने वाहून गेले. रात्री अंधार असल्याने शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत असल्याने शुक्रवारी पुन्हा शोध मोहीम सुरू केली असता संध्याकाळपर्यंत अशोक चव्हाण याचा शोध लागला नसल्याचे माने यांनी सांगितले.
तळेगाव पोलीस, वन्यजीव रक्षक मावळ, शिवदुर्गमित्र लोणावळा व तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशामक दलाचे जवानांचे शोधकार्य दुसऱ्यादिवशीही सुरूच होते.