Arvind Kejriwal Bail Hearing । दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. सर्वोच्च न्यायालयाने आज केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर आम्ही 1 जूनपर्यंत अंतरिम सुटका करणार आहोत, असे सांगितले.
२ जूनला आत्मसमर्पण करावे लागणार Arvind Kejriwal Bail Hearing ।
दरम्यान, केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर जुलैमध्ये सुनावणी घेण्याची मागणी केली. यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले की, केजरीवाल यांच्या या याचिकेवरील वाद पुढील आठवड्यात संपवण्याचा प्रयत्न करू. सॉलिसिटर जनरल यांनी ईडीतर्फे हजर राहून न्यायमूर्ती संजीव खन्ना, दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाला अरविंद केजरीवाल यांना मुदत संपल्यानंतर आत्मसमर्पण करण्यास सांगण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने सांगितले की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना २ जूनला आत्मसमर्पण करावे लागेल. अंतरिम जामीन मंजूर करताना अटींबाबत न्यायालयाकडे काहीही नाही.
#SupremeCourt to consider today the grant of interim bail to Delhi Chief Minister #ArvindKejriwal in the Delhi liquor policy case.
A bench of Justices Sanjiv Khanna and Dipankar Datta will hear the matter (item no.50)
Kejriwal is under custody since his arrest on March 21. pic.twitter.com/38XfvL97Q2
— Live Law (@LiveLawIndia) May 10, 2024
ईडीचा जामिनाला विरोध Arvind Kejriwal Bail Hearing ।
गेल्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याचे संकेत दिले होते. यामुळेच ईडीने गुरुवारी केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध करत प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. कायदे सर्वांसाठी समान असून लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणे हा मूलभूत, घटनात्मक किंवा कायदेशीर अधिकार नाही, असे तपास यंत्रणेने म्हटले होते.
प्रचारासाठी कोणत्याही राजकीय नेत्याला जामीन मिळालेला नाही, असे तपास यंत्रणेने म्हटले होते. केजरीवाल यांना ‘आप’च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तुरुंगातून बाहेर पडू देणे चुकीचे उदाहरण ठरेल. याआधी मंगळवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी २० मेपर्यंत वाढवली होती.