prajwal Revanna। लोकसभा निवडणुकी दरम्यान कर्नाटकमध्ये वेगळाच सावळा गोंधळ सुरु आहे. याठिकाणचे हासन लोकसभेचे खासदार आणि जेडीएस पक्षाचे नेते प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घातलंय. त्यानुसार आयोगातर्फे एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. ज्यात कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर पीडित महिलांनी आरोप केल्याचं म्हटलंय.
तर वेश्या व्यवसायाच्या प्रकरणात अडकवू Prajwal Revanna।
राष्ट्रीय महिला आयोगाने सांगितले की, या प्रकरणातील एका पीडित महिलेने तिच्यावर खोटी तक्रार दाखल करण्यासाठी दबाव टाकल्याचे म्हटले आहे. खोटी तक्रार दाखल न केल्यास वेश्या व्यवसायाच्या प्रकरणात अडकवू अशी धमकी या महिलेला देण्यात आली असल्याचेही राष्ट्रीय महिला आयोगाने आपल्या निवेदनात सांगितलंय.
महिलांवर दबाव टाकला जातोय Prajwal Revanna।
राष्ट्रीय महिला आयोगाच्या या निवेदनानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एचडी कुमारस्वामी यांनीही गुरुवारी राज्य सरकारच्या स्थापन केलेल्या विशेष तपास पथकावर टीका केली. महिलांनी खोट्या तक्रारी दाखल कराव्यात यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी पीडित महिलांना धमकावले असून त्यांना काँग्रेस सरकारच्या बाजूने तक्रार दाखल करण्यास भाग पाडले आहे. अशी तक्रार दाखल न केल्यास त्यांच्यावर वेश्याव्यवसायाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली आहे.
हासन लोकसभेच्या खासदाराचे सेक्स व्हिडीओ प्रकरण हे जगातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल आहे, अशी टीका कर्नाटकचे महसूल मंत्री कृष्णा गौडा यांनी केले होते. या टीकेचा समाचार घेताना एचडी कुमारस्वामी म्हणाले की, एसआयटीचे अधिकारी पीडितांच्या घरी जाऊन त्यांना धमकावत आहेत. एसआयटीचे अधिकारी खोट्या धमक्या देऊन पीडितांना तक्रार करण्यास भाग पाडत नाहीत का? अशाप्रकारे कोणत्या खटल्याचा तपास केला जातो का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
हेही वाचा
लैंगिक छळाचे 2 हजार 973 व्हिडीओ आले समोर; JDS पक्षातून खासदार प्रज्वल रेवण्णा निलंबित