शिरूर -कवठे येमाई येथे मुंबईवरून आलेल्या चौथ्या लहानग्या मुलीचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.
शिरूर तालुक्यात कवठे यमाई येथे मुंबईवरून आलेल्या आजी, आजोबा आणि दोन नाती असे चार जण मुंबईवरून कवठे येमाई येथे आले होते. त्यांना कवठे प्राथमिक रुग्णालयाच्या सल्ल्याने क्वारंटाइन करण्यात आले होते; परंतु त्यांच्या हिस्टरीमध्ये मुंबई येथे त्यांचा मुलगा करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे व त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजल्यावर या चार जणांची करोना टेस्ट केली.
यात 19 मे रोजी चारपैकी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आज (दि. 22) चौथ्या लहान मुलीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कवठे यमाई परिसर सील केला असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या काही नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.