पुणे – पुणे जिल्हा मुस्लिम वकील असोसिएशन तर्फे करोना काळात निधन झालेल्या वकिलांसाठी श्रध्दांजली वाहण्यात आली. रोजा इफ्तार पुर्वी सामुहिक प्रार्थना केली गेली. त्याचप्रमाणे राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था, जातीय सलोखा राहावा, सौहार्दाचं वातावरण बिघडू नये, यासाठी याकरिता दुवा करण्यात आली. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या प्रथमवर्ग न्यायाधीशाचा सत्कार तसेच मान्यवर वकिलांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बार कैन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ऍड. अहेमदखान हाजी उस्मानखान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास कॉंग्रेस पार्टी लीगल सेलचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ऍड. शाहिद अख्तर, ऍड. समीर इस्माईल शेख, ऍड. ज़हीर खान अहेमद खान पठाण, ऍड. आयूब कासम शेख, ऍड. आर. के. सय्यद मॅडम, ऍड. रुखसाना शेख, ऍड. फेहमिना नजीर शेख ऍड. डॉ. नाजिया मूजीब तलफदार पठाण, ऍड. शहेजादी सय्यद, ऍड. फैयाज शेख, ऍड. साबीर खान यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. ईब्राहिम हाजी अब्दुल शेख यांनी केले. तर आभार ऍड. सुफीयान मुख्तार शेख यांनी मानले.