राष्ट्रवादीकडून उंब्रज बंदचे आवाहन
उंब्रज – खा. शरद पवार यांच्यावर ईडीमार्फत होत असलेल्या चुकीच्या कारवाई विरोधात आज दि. 27 रोजी उंब्रज बंद ठेवण्यात येत आहे. तरी सर्व व्यापारी वर्गाने उंब्रज बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी उंब्रज शहर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
जीवितहानी नाही.
उंब्रज – उंब्रज ता. कराड गावच्या हद्दीत पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर कंटनेरचा टायर फुटून चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनर महामार्गावर पलटी झाल्याची घटना गुरूवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात कंटेनरचे नुकसान झाले असून कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर बंगलोरकडे चाललेला कंटेनर क्र. डी. एन. 09 पी 9910 उब्रंज पोलीस स्टेशनसमोर आला. यावेळी त्याचा पाठीमागील टायर फूटन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनर महामार्गावरील दुभाजकावर जाऊन पलटी झाला.
यामुळे महामार्गावरील कराड बाजुकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उब्रंज पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रविण फडतरे व पोलीस कर्मचारी, हायवे टॅपचे जाधव व कर्मचारी तसेच हायवे हेल्पलाईनचे दस्तगीर आगा व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.