कोल्हापूर (प्रतिनिधी) – गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये दरवाढ मिळावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यभर आंदोलन पुकारल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध दरवाढीसाठी आक्रमक झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील उदगाव इथल्या रामलिंग मंदिरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शंभू महादेवाला दुग्धाभिषेक करून आरती केली आहे. जवळपास अर्धा तास विधिवत मंत्रोच्चार करून दुग्धाभिषेक घालण्यात आला. नंतर अरतीही करण्यात आली. यावेळी राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारला सुबुद्धी देण्याचं शंभू महादेवाला साकडं घेतलं असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात देण्यासाठी हे साकडे घातले असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. तसेच आंदोलना मागच्या शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या असे आवाहन देखील राजू शेट्टी यांनी केल आहे.