सुनील शेळकेंच्या पदयात्रेचा देहूरोड परिसरात धमाका

तळेगाव – मावळ मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, एसआरपी, मित्रपक्ष महाआघाडीच्या उमेदवार सुनील शेळके यांचा बुधवारी देहूरोड भागात प्रचार दौरा झाला. यावेळी आयोजित पदयात्रांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पदयात्रांमध्ये नागरिक मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

सकाळच्या सत्रात शेलारवाडी, इंद्रायणीदर्शन, साईनगर, गहुंजे, थॉमस कॉलनी, मामुर्डी, शितळानगर, मेहता पार्क या भागातून पदयात्रा काढण्यात आली. मामुर्डी येथे सुनील शेळके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी फुलांच्या वर्षावात फटाक्‍यांची आतिषबाजी करून शेळके यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी माजी मंत्री मदन बाफना, नगरसेवक किशोर भेगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस देहूरोडचे पदाधिकारी जालिंदर राऊत, धनंजय मोरे, रोहिदास राऊत, वैभव राऊत, कॉंग्रेसचे मोहन राऊत, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय राऊत यांच्यासह शिवशक्ती तरुण मित्र मंडळ, जयभवानी तरुण मित्र मंडळ, अमर मित्र मंडळ, काका हलवाई मित्र मंडळ, जोगेश्‍वरी देवी उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शेळके यांनी यावेळी मतदारांशी संवाद साधला. नागरिकांनीही मोकळेपणाने आपल्या अडचणी शेळकेंना सांगितल्या. एक वेळ संधी द्या, इथल्या समस्या पूर्ण संपवेन, अशी ग्वाही सुनील अण्णांनी नागरिकांना दिली.

शितळानगर चौकातही सुनील अण्णांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देहूरोड शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, उपाध्यक्ष शंकर टी जयसिंग, विशेष कार्यकारी अधिकारी वसीम मणियार, पार्वती बाबू, नगरसेविका गंगुताई खळेकर, राजू मारीमुत्तू, कॉंग्रेसचे नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू, प्रवीण झेंडे, धीरज नायडू आदी यावेळी
उपस्थित होते.

महिला वर्गाकडून ठिकठिकाणी औक्षण
बरलोटा नगर येथे सुनील शेळकेंच्या पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. महिला वर्गाकडून त्यांचे औक्षण करण्याची चढाओढ दिसून आली. सर्व नागरिकांशी मनमोकळा संवाद साधताना सुनील अण्णांनी निवडून आल्यानंतर लगेचच या भागातली प्रलंबित कामे पूर्ण करून देणार असल्याचे आश्‍वासन दिले.

यापुढे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी नागरिकांनीही आपले पूर्ण समर्थन सुनील अण्णांना असून त्यांनाच मत देणार असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी प्रसाद निम्हण, डेव्हिड नागर, निखिल मुळे, के.सी. बिर्लान, संतोष कुमार, तुळशीराम गायकवाड आदी सामाजिक कार्यकर्ते, बरलोटा नगर महिला मंडळाच्या सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.