Sunetra Pawar | Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. । Sunetra Pawar | Lok Sabha Election 2024
खासदार सुप्रिया सुळे या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे, अशी अटीतटीची आणि लक्षवेधी लढत होणार आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
बारामती मतदारसंघ हा परंपरागतपणे पवार घराण्याचा बालेकिल्ला आहे. शरद पवार यांचे 1967 पासून बारामतीवर एकहाती वर्चस्व आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी बारामतीचे लोकप्रतिनिधित्व केले आहे.
आता खासदार सुप्रिया सुळे या चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच नशिब अजमावत आहेत. त्यामुळे ही लढत शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठतेची झाली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे यापूर्वीच तापलेले बारामतीचे मैदान पुन्हा चांगलेच तापणार आहे.
शरद पवार यांच्या कुटुंबीयात प्रथमच फूट पडल्यानंतर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठतेची झाली आहे. दरम्यान, आज सुनेत्रा पवार मतदारसंघात गावभेट दौरा करत आहेत.
सुनेत्रा पवार सलग दुसऱ्या दिवशी बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज मुळशीमधील बावधन परिसरातील विविध सोसायट्यांना त्या भेटी देत आहेत. । Sunetra Pawar | Lok Sabha Election 2024
त्या दौऱ्यादरम्यान नागरीकांच्या भेटी घेत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत आहेत. सुनेत्रा पवार त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत. यावेळी विकासाशी बांधिलकी जपणाऱ्या अजितदादांच्या विचाराचा खासदार व्हावा.
यासाठी घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन त्या ठिकठिकाणी करत आहेत. कालच बारामती लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर आज त्या मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधत आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्व भूमीवर गेल्या 20-25 दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघात गावाभेट दौरा करत आहे. कालच महायुतीकडून मला उमेदवारी देऊन जवाबदारी दिली आहे.
त्यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेल. उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आभार. पक्षाच्या आणि मतदारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असं सुनेत्रा पवार यावेळी बोलताना म्हणाल्या. । Sunetra Pawar | Lok Sabha Election 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरात विकास पुरुष म्हणलं जातं. याचं विकासाचा धागा धरून अजित पवारांनी याचा पाईक होण्याचं ठरवलं आहे. आपलं चिन्ह घड्याळ आहे. घड्याळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान… त्यामुळे यंदा घड्याळाला मतदान करा…, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी मतदारांना केलं आहे.