बारामती (प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचार दौऱ्याचा प्रारंभ सावंतवाडी गावापासून झाला. यावेळी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची माहिती देऊन महायुतीला विक्रमी मताधिक्य देण्याची ग्वाही गावकऱ्यांनी यावेळी दिली. सावंतवाडी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माझे स्वागत केले सन्मान केला. यावेळी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
दुपारच्या वेळी सोनवडी गावात गेले असता चक्क एका भल्यामोठ्या वटवृक्षाच्या छायेत सुनेत्रा पवार यांनी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. यापुढील काळात आपला हा भाग केद्र सरकरच्या माध्यमातून पाणी टंचाईमुक्त करण्याचा विश्वास ग्रामस्थांना दिला. महायुतीला साथ देण्याचे आवाहन यावेळी सुनेत्रा पवार यांनी नागरिकांना केले.
जे काम हाती घेते, ते पूर्णच करते
बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी येथून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांकडून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सुनेत्रा पवार यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात याच परिसरातून केली असल्याचे सांगितले.
ओढा खोलीकरणासारखे उपक्रम राबवल्याचा फायदा झाल्याचे नमूद केले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी दुवा म्हणून मी काम करेन, असे सांगून मी जे काम हाती घेते. ते पूर्णत्वाला नेतेच हे बारामतीकरांना ज्ञात असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या.