Devendra Fadnavis | Rahul Gandhi | Savarkar movie – काॅंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वाचले नाही किंवा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळेच ते सावरकरांबद्दल बिनबुडाची विधाने करतात.
मी राहुल गांधींचा विरोधक आहे. पण मी त्यांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन करतो आणि त्यांची इच्छा असेल तर हा चित्रपट पाहण्यासाठी, मी माझ्या पैशाने त्यांच्यासाठी संपूर्ण थिएटर बुक करु शकतो.
कदाचित मग ते सावरकरांबद्दल निराधार विधाने करणे बंद करतील, अशी मला आशा आहे”. असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. । Devendra Fadnavis | Rahul Gandhi | Savarkar movie
महान क्रांतीकाररीनेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट राष्ट्रीय शहीद दिनानिमित्त म्हणजेच २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
त्यावेळी मुंबईत फडणवीस म्हणाले होते की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचे थोडे तरी साहित्य वाचावे, तरच ते त्यांच्याबद्दल निराधार बोलणे बंद करतील.
राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविरोधात अनेकदा भाष्य केले आहे. त्यांनी सावरकरांचा उल्लेख माफीवीर असा केला होता. वीर सावरकरांविरोधात त्यांनी ‘भारत जोडो’ या कार्यक्रमातही वादग्रस्त वक्तव्य केले होते.
हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेले सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात झाला. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
रणदीप हुड्डा यांनी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. । Devendra Fadnavis | Rahul Gandhi | Savarkar movie