success story । आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण घेऊनही चांगली नोकरी मिळण्याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. त्यातच स्वतः ला सिद्ध करण्याची जिद्द फार कमी लोकांमध्ये असते. उत्तर प्रदेशच्या एका छोट्या गावातून अशीच जिद्द घेऊन दिल्लीत आलेल्या एका युवकाने अपयशाच्या पायऱ्या चढल्या. त्यातून आज यशाची शिखरे पार केली आहेत.
उत्तर प्रदेशच्या हरिहरपूर गावात राहणारे रवी प्रसाद सामान्य लोकांप्रमाणेच शिक्षणानंतर रोजगाराच्या शोधात दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांच्या मित्राने त्यांना दिल्लीच्या प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय जत्रा भरल्याचे सांगितले. त्याठिकाणी रोजगाराच्या नवीन संधी दाखवल्या जातात.
तिथे पोहोचल्यावर एका स्टॉलवर केळीच्या झाडातून फायबर काढण्यासाठी मशीन बसवलेली त्यांना दिसली. त्यातून हातमाग आणि हस्तकलेच्या वस्तू बनवल्या जात होत्या. ते ऑर्गेनिक कंपोस्ट आणि ‘केळीचे पाणी’ दाखवत होते, तेव्हा त्यांना वाटले की जर ते हे करू शकतात तर आपण का नाही? आणि यातूनच त्यांच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
काम शिकणे सोपे नव्हते success story ।
स्टॉल लावणाऱ्या व्यावसायिकाला केळीचे फायबर काढण्याची कला शिकविण्याची विनंती त्यांनी केले. व्यावसायिकानेही होकार दिला आणि त्याला कोईम्बतूरपासून 160 किमी दूर असलेल्या गावात बोलावले. सुमारे एक महिना केळीच्या फायबरपासून उत्पादने बनवण्याचे प्रशिक्षण रवीने घेतले.
2018 साली दक्षिण भारतात प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वतःचे काम सुरू करून गावी परतण्याचा निर्णय घेतला. आता समस्या भांडवलाची होती. कुशीनगरमध्ये प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला. कर्ज मिळणेही सोपे नव्हते. भांडवलाअभावी आपले स्वप्न संपल्याचे एका क्षणी त्याला वाटले. काही काळानंतर पाच लाखांचे कर्ज मंजूर होऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला.
‘बनाना फायबर’ कुशीनगर जिल्ह्याची ओळख बनली success story।
रवी प्रसाद यांनी, त्याला जवळच्या शेतकऱ्यांकडून केळीची झाडे मिळतात. त्यातून त्यांचा हस्तकला व्यवसायाचा प्रवास सुरू झाला. त्याच वेळी, 2018 मध्ये, यूपी सरकारने ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) योजना सुरू केली होती. त्यातून त्यांना मदत मिळाली आणि केळीचा फायबर ही कुशीनगरची ओळख बनली. आता त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मेळ्यांमध्ये स्टॉल लावण्याची संधीही मिळते.
700 महिलांना ‘बनाना फायबर’ प्रशिक्षण success story।
आता रवी प्रसाद यांना सरकारकडूनही मदत मिळू लागली. महिलांसाठी 10 दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू झाले आहे. महिलांना 10 दिवसांसाठी 2000 रुपये चहा-नाश्ता आणि 200 रुपये रोजचे मानधन मिळू लागले. प्रशिक्षणानंतर मला प्रमाणपत्र आणि काम सुरू करण्यासाठी मदत मिळू लागली. आतापर्यंत त्यांनी 700 महिलांना केळीचे फायबर बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
त्यांचा माल ऑनलाइन विकला जातो. आम्ही जत्रांमध्ये स्टॉल लावतो तेव्हा तेथील घाऊक व्यावसायिकांशी आमचा संबंध येतो. त्यांची ऑर्डर मिळते. सध्या पूजा आसन आणि योगा मॅटसाठी भरपूर ऑर्डर मिळत आहेत.
त्यांना मिळणाऱ्या बहुतेक ऑर्डर महिलांना बनवण्यासाठी दिल्या जातात. कापड कंपन्यांमध्येही केळीच्या फायबरला मागणी आहे. त्याला 2021 मध्ये राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला आहे. एका महिन्यात सुमारे 2 ते 2.5 लाख रुपयांची उत्पादने विकली जातात. आता या फर्मची वार्षिक उलाढाल 2 कोटींहून अधिक आहे.