Kuldeep Kumar। देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. त्यासाठी दोन टप्प्यातले मतदान झाले आहे. दरम्यान, दिल्ली लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीतील आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांनी आपल्या प्रचाराचा धडाका कायम ठेवलाय. नुकतेच त्यांनी आपचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याविषयी महत्वपूर्ण विधान केले आहे.
अरविंद यांना सरकारने तुरुंगात टाकले Kuldeep Kumar।
आप कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या ‘जेल का जवाब वोट से’ मोहिमेवर कुलदीप कुमार यांनी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “…दिल्लीतील जनतेला उत्तम शाळा आणि मोफत वीज देण्याचे काम करणारे मुख्यमंत्री अरविंद यांना सरकारने तुरुंगात टाकले आहे. भाजपवर खोट्या खटल्याचा आरोप आहे.” त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा आजपासून दिल्लीतील जनतेचा पाठिंबा आणि आशीर्वाद घेण्यासाठी रोड शो सुरू होणार आहे.
भावना आणि संतापाशी संबंधित Kuldeep Kumar।
दिल्ली लोकसभा निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार आणि आम आदमी पक्षाचे नेते कुलदीप कुमार म्हणाले की, ही निवडणूक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर भावना आणि संतापाशी संबंधित आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ‘विद्यार्थीदशेत वर्तमानपत्रे वाटण्यापासून ते नगरसेवक आणि नंतर आमदार होण्यापर्यंत आणि आता पूर्व दिल्ली संसदीय मतदारसंघातून आपचे उमेदवार बनण्यापर्यंत त्यांनी संघर्ष भरलेले जीवन पाहिले आहे.
दरम्यान, दिल्लीतील मध्य धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्याचाच निषेध सध्या सर्व देशभरातील आप कार्यकर्ते करत आहेत.
हेही वाचा
Video: “जेल के जवाब में हम वोट देंगे”, आपच्या प्रचारगीतात केजरीवाल यांच्या अटकेवर फोकस