kareena kapoor khan। करीनाच्या लेकाला फुटबॉलपटू लियोनार्डो मेस्सीसारखा व्हायचे

kareena kapoor khan । अभिनेत्री करीन कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या मोठा मुलगा स्टार कीडच्या यादीत सर्वात फेमस आहे. सोशल मीडियावर त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तैमूरच्या चाहत्यांना वाटते कि तो मोठा झाल्यावर हिरो बनणार आहे. मात्र तैमूरला एक्टिंग लाइनमध्ये करिअर करायचे नाही. त्याचे वेगळे स्वप्न आहे. तैमूरला स्पोर्ट्स पर्सन बनायचे आहे.
हेही वाचा
Mithun Chakraborty Hospitalised। ‘मिथुन दा’ यांना ‘ब्रेन स्ट्रोक’; कोलकाता रुग्णालयात दाखल
सैफ अली खानने नुकताच एका मुलाखतीत आपल्या मुलाच्या करिअरबाबत खुलासा केला. सैफ अली खानने सांगितले माझ्या मोठ्या मुलाला करिअरमध्ये लीड गिटारिस्ट किंवा फुटबॉल प्लेयर व्हायचं आहे. यावेळी करिनाने सैफच्या बोलण्यावर होकार देत सांगितले की,’तैमूरला Lionel Messi सारखे व्हायचे आहे.’
सैफ आणि करीनाच्या वर्क फ्रंट बाबत सांगायचे झाल्यास, नुकताच सैफ ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर ६०० कोटींचा बिजनेस केला. तर करीना The Buckingham Murders मध्ये लीड रोलमध्ये दिसली होती. या शिवाय करीनाने ‘जाने जान’ मधून ओटीटी डेब्यू केले. सैफ अली खान आता जूनियर एनटीआर सोबत फिल्म ‘देवारा’ मध्ये दिसणार आहे. तर करीना ‘द क्रू’ मध्ये दिसणार आहे.





