पुणे :- सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे आयोजित सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत साखळी फेरीत लॉयला स्कुल, कल्याणी स्कुल, विद्या व्हॅली , सेंट व्हिन्सेंट स्कुल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली. सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत फुटबॉल लीग स्पर्धेत कल्याणी स्कूल संघाने श्री श्री रविशंकर विद्या मंदिर संघाचा २-० असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून सामन्या दीक्षित (२ मि.), रुहान (१५ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
सोहम दळवी (३,६,१२ मि.) याने केलेल्या तीन गोलांच्या जोरावर आर्यन वर्ल्ड स्कूल संघाने दस्तूर संघाचा ८-० असा सहज पराभव केला. फादर एग्नेल संघाने ह्यूम मॅकेनरी संघाचा २-० असा एकतर्फी पराभव केला. फादर एग्नेल संघाकडून कताद शेख (५, १४ मि.) याने दोन गोल केले. हॉकी लीगमध्ये लॉयला स्कुल संघाने सेंट व्हिन्सेंट ‘ब संघाचा ९-० असा धुव्वा उडवला.
लॉयला स्कुलकडून स्कायलर राज (२,३,१०,११,१९,२०,२३ मि.) याने सात गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात लॉयला स्कुल संघाने १-० असा पराभव केला. बास्केटबॉल लीगमध्ये जेएन पेटिट संघाने सेंट पॅट्रिक्सचा १२-० असा पराभव करून आगेकूच केली.