पुणे – डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत मुंबईच्या महेश जगदाळे, पुण्याच्या अमरदीप घोडके, जेसन मल्होत्रा, अमितकुमार सिन्हा, पिनाक अनाप आणि रोहन साकळकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत क्यु क्लबच्या अॅलेक्स् रेगो याने मुंबईच्या महेश जगदाळे याचा ४०(२८)-१०, ५३-१७ असा सहज पराभव केला. अॅलेक्स् याने आपल्या विजयामध्ये पहिल्या फ्रेममध्ये २८ गुणांचा बे्रकही नोंदविला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात जेसन मल्होत्रा याने विवेक एसएम याचा ४४-१९, ३७-४७, ३३-२४ असा पराभव केला.
अमितकुमार सिन्हा याने सुमित घडीयाली याचा ३७-४६, ५५-१५, ५०-४७ असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. पिनाक अनाप याने औरंगाबादच्या रोहीत रावत याचा ३७-०४, ५६-०८ असा सहज पराभव केला.
#U19WorldCup2024 #INDvIRE | भारताचा सलग दुसरा विजय, आयर्लंडचा 201 धावांनी केला पराभव…
अमरदीप घोडके याने सलग दोन विजय मिळवले. पहिल्या सामन्यात अमरदीप याने सुदर्शन शिवराम याचा ६९-१७, ७०-२८ असा पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात अमरदीपने गौरव वाडे याचा ४४-०९, ९९-२६ असा पराभव करून आगेकूच केली.
मुंबईच्या महेश जगदाळे याने पुण्याच्या प्रशांत पवार याचा ४३-२४, ८८-०९ असा सहज पराभव केला. रोहन साकळकर याने सुकील व्ही. याचा ४८-०९, ७२-६२ असा पराभव करत विजयी कामगिरी केली.