तामुलपूर :– चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुषांनी नेपाळचा 6 गुण आणि एका डावाने तर भारतीय महिलांनी त्याच प्रतिस्पर्ध्यांचा 33 गुणांनी आणि एका डावाने पराभव करत विजेतेपदावर पटकाविले.
आसाममधील “बाक्सा’ जिल्ह्यातील तामुलपूर येथे गुरुवारी स्पर्धेचे अंतिम सामने रंगले ज्यात भारताच्या दोन्ही संघांनी बाजी मारली. याआधी उपांत्य फेरीत भारतीय पुरुषांनी श्रीलंकेच्या आव्हानाचा 45 गुणांनी पराभव केला होता.
महिला विभागाच्या उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा 49 धावांनी आणि एका डावाने पराभव केला होता. पुरुष आणि महिला गटात अनुक्रमे श्रीलंका आणि बांगलादेशने तिसरे स्थान पटकावले आहे.
Maharashtra Kesari : प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला ‘महाराष्ट्र केसरी’ची मानकरी
टीम इंडियाचा कर्णधार अक्षय भांगरे यावेळी म्हणाला की, “ही चॅम्पियनशिप जिंकून मी खूप उत्साहित आणि आनंदी आहे. भारतीय असल्याने, घरच्या मैदानावरील स्पर्धेत खेळून जिंकणे अभूतपूर्व असते. संपूर्ण स्पर्धेत संघांना पाठिंबा दिल्याबद्दल तामुलपूरमधील प्रेक्षकांचे आभार. येथील प्रेक्षकांचा पाठिंबा महत्त्वाचा होता. त्यामुळेच आम्ही आमचे सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरित होऊ शकलो.’