पुणे – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे आयोजित सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत फुटबॉल लीगमध्ये साखळी फेरीत सेंट व्हिन्सेंट स्कूल, विद्या व्हॅली स्कुल, लॉयला स्कुल, आर्यन वर्ल्ड स्कूल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात अंश लोढा(५ मि.), सम्यक भंडारी(१५ मि)यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट स्कूल संघाने ह्यूम मॅकहेन्री संघाचा २-० असा पराभव केला. हचिंग्ज संघाने दस्तूर को-एड संघाचा ८-० असा धुव्वा उडवला.
विजयी संघाकडून प्रणीत जे(२,४,११,१५ मि.)याने चार गोल, तर शौर्यजीत के(१०मि.),आर्यन एच(१८ मि.),पार्थ पटेल(२५ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. अन्य लढतीत अनुराग पारसनीस(१२ मि.) याने नोंदवलेल्या एकमव गोलाच्या जोरावर लॉयला स्कुल संघाने आर्यन वर्ल्ड स्कूलचा १-० पराभव केला. विद्या व्हॅली स्कुल संघाने सेंट पॅट्रिक स्कूल संघावर ४-० असा विजय मिळवला.