मुंबई : राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी काल मतदान पार पडले. त्यापैकी 95 बाजार समित्यांची आज मतमोजणी पार पडणार आहे. तर काही ठिकाणी आज मतदान होणार आहे. त्यानुसार हळुहळू निकाल समोर येत आहेत. बुलढाणा जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटास माेठा धक्का दिला. त्यानंतर आता पालघरमधूनही भाजपसाठी वाईट बातमी समोर आली आहे.
पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील शिंदे गटासह भाजपला माेठा दणका बसला आहे. या बाजार समितीच्या सर्व जागांवर महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले आहे.
पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मविआने 17 जागांवर वर्चस्व प्राप्त केले. यापुर्वी झालेल्या छाननीत पंधरा जागा बिनविरोध झाल्या होत्या. शुक्रवारी झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप आणि शिवसेनेला एक ही जागा मिळवता आली नाही.
* पालघर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचा निकाल
महविकास आघाडी विजयी उमेदवार
हिम्मत जैन – 117 मत
पंकज शहा – 102 मत
* पराभूत उमेदवार
निलेश राऊत – 40 मत
चंद्र किशोर चौधरी – 43 मत