T20 World Cup 2024 :- भारतीय संघाने अंडर-19 विश्वचषक 2012 जिंकला होता. या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद होता, मात्र आता उन्मुक्त चंद वेस्ट इंडिज व अमेरिका येथे येत्या जून महिन्यात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध खेळताना दिसणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात 12 जून रोजी वर्ल्ड कप टी-20 सामना होणार आहे.
उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंडर-19 विश्वचषक 2012 जिंकला होता. पण आता या संघातील काही खेळाडू अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय संघाचा भाग बनले आहेत. तुम्हाला माहिती आहे का की जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त संजू सॅमसन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव सारखे खेळाडू उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत.
आगामी T20 विश्वचषकात भारत आणि अमेरिका हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात उन्मुक्त चंद भारताविरुद्ध अमेरिकेकडून खेळताना दिसणार आहे. उन्मुक्त चंद व्यतिरिक्त हरमीत सिंग आणि स्मित पटेल हे अंडर-19 विश्वविजेत्या संघात होते, पण आता हे तीन क्रिकेटपटू भारताविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हरमीत सिंग 2012 च्या अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचा सदस्य होता. आता तो हरमीत सिंग अमेरिकेकडून खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. याशिवाय स्मित पटेलचे नावही या यादीत सामील आहे. उन्मुक्त चंद आणि हरमीत सिंग यांच्याशिवाय स्मित पटेलही अमेरिकेकडून खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. हे तिन्ही खेळाडू आगामी टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून – वि आयर्लंड, न्यूयॉर्क
9 जून – वि.पाकिस्तान, न्यूयॉर्क
12 जून – वि यूएसए, न्यूयॉर्क
15 जून – वि.एस. कॅनडा, फ्लोरिडा
उन्मुक्त चंद : जर आपण उन्मुक्त चंदबद्दल बोललो तर तो आता 30 वर्षांचा आहे. चंदने 2012 च्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकणारे शतक झळकावले, त्यानंतर त्याला भारतात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतीय देशांतर्गत सर्किटमध्ये अनेक वर्षे अडचणींचा सामना केल्यानंतर, चंद 2021 मध्ये अमेरिकेत गेला. येथे पोहोचताच त्याने सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्सचे नेतृत्व करताना मायनर लीग क्रिकेट T20 मध्ये विजय मिळवून दिले. मायनर लीग चॅम्पियनशिपच्या गेल्या 3 हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. येथे त्याने 43 च्या सरासरीने 1500 हून अधिक धावा केल्या आहेत.
स्मित पटेल : आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज स्मित पटेलने अंडर 19 विश्वचषक फायनलमध्ये 62 धावांची छोटी पण धाडसी खेळी खेळली. स्मितने गुजरात, त्रिपुरा आणि बडोदा यांसारख्या संघांसोबत प्रथम श्रेणी सामने खेळले. बडोद्याकडून खेळल्यानंतर 2020 मध्ये SMA ट्रॉफीसाठी स्मित अमेरिकेला गेला.
हरमीत सिंग : 2012 अंडर-19 विश्वचषक संघात उन्मुक्त चंदसोबत डावखुरा फिरकीपटू हरमीत सिंग होता. त्यावेळी क्रिकेट तज्ज्ञांनी त्यांची तुलना महान बिशनसिंग बेदी यांच्याशी केली होती. त्याचा घरचा संघ मुंबईने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर त्याला त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागले. 2020 मध्ये हरमीत अमेरिकेत गेला.
दरम्यान, उन्मुक्त चंद, हरमीत सिंग आणि स्मित पटेल हे तीन खेळाडू आहेत ज्यांनी टीम इंडियाला 2012 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन बनवले होते. आता हे त्रिकूट अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषकात भारताविरुद्ध खेळताना दिसणार आहे.