Sports In Pune :- फ्रीरनर्स चॅरीटेबल ट्रस्टतर्फे येत्या जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दिनांक १० मार्च रोजी महिला विशेष अर्ध मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जवळपास ४ ते ५ हजार स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता असून अशा प्रकारची ही देशातील पहिलीच मॅरेथॉन ठरणार आहे.
पुणे येथील पोलिस अधिक्षक कार्यालयापासून या स्पर्धेचा प्रारंभ होणार असून या स्पर्धेमध्ये ५, १० व २१ किलोमिटर असे टीन गट करण्यात आले असून वय वर्षे ८ ते ८० या वयोगटातील कोणत्याही महिलांना या स्पर्धेत भार घेताल येणार आहे. या स्पर्धेतून मिळणारा निधी सामाजीक कार्यासाठी वापरला जाणार असल्याचे फ्रिरनर्स टॅरीटेबल ट्रस्टच्या स्पर्धा संचालक फातीमा चक्कीवाला यांनी सांगितले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देण्याचेही आहावन करण्यात आले आहे.