IND vs ENG 4th Test : अश्विनने कसोटीत रचला इतिहास, इंग्लंडविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू…

IND vs ENG 4th Test, Ravichandran Ashwin Record : भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान मोठी कामगिरी केली. रांची येथे शुक्रवारी (23 फेब्रुवारी) इंग्लंडच्या पहिल्या डावात अश्विनने जॉनी बेअरस्टोला (LBW) पायचीत केले. या विकेटसह त्याने इतिहास रचला. अश्विनने इंग्लंडविरुद्ध कसोटीत 100वी विकेट घेतली. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला.
तसेच भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात 100 बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी इंग्लिश संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने ही कामगिरी केली होती.
इंग्लंडपूर्वी अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत 100 बळींचा टप्पा ओलांडला आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत आतापर्यंत 114 विकेट्स घेतल्या आहेत. ही आकडेवारी पाहता अश्विन ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरूध्द कसोटीत सरस आहे, असे म्हणता येईल.
A special 💯! 👏 👏
1⃣0⃣0⃣th Test wicket (and counting) against England for R Ashwin! 🙌 🙌
Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/uWVpQnx3jz
— BCCI (@BCCI) February 23, 2024
याआधी, राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीच्या माध्यमातून भारतीय फिरकीपटू अश्विनने 500 कसोटी बळींचा टप्पा गाठला होता. आर अश्विन हा भारताचा 500 कसोटी बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. भारतासाठी, माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे हा 500 कसोटी बळींचा टप्पा पार करणारा पहिला गोलंदाज ठरला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू….
जेम्स अँडरसन (इंग्लंड) : 37 सामने 145 बळी
रविचंद्रन अश्विन (भारत) : 23 सामने 100* बळी
बीएस चंद्रशेखर (भारत) : 23 सामने 95 बळी
अनिल कुंबळे (भारत) : 19 सामने 92 बळी
बिशनसिंग बेदी (भारत) : 22 सामने 85 बळी
कपिल देव (भारत) : 27 सामने 85 बळी
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) : 24 सामने 74 बळी
इशांत शर्मा (भारत) : 23 सामने 67 बळी
रवींद्र जडेजा (भारत) : 19 सामने 64 बळी
बॉब विलिस (इंग्लंड) : 17 सामने 62 बळी
अश्विनचे नाव विशेष यादीत दाखल…
अश्विन हा एकाच संघाविरुद्ध कसोटीत 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तसेच यासोबत 100 बळी घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज गिफेनने इंग्लंडविरुद्ध, ऑस्ट्रेलियाच्या मोनी नोबलने इंग्लंडविरुद्ध, इंग्लंडच्या विल्फ्रेड रोड्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध, वेस्ट इंडिजच्या गारफिल्ड सोबर्सने इंग्लंडविरुद्ध, इंग्लंडच्या इयान बॉथमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध, इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.
WPL 2024 : आजपासून रंगणार ‘महिला आयपीएल’चा थरार, ‘या’ दोन संघात होणार सलामीची लढत…
अश्विनने इंग्लंडविरुद्ध केवळ 23 सामन्यांमध्ये 1000 धावा आणि 100 बळींचा दुहेरी टप्पा पूर्ण केला. या बाबतीत फक्त इयान बोथम त्याच्या पुढे आहे. इंग्लंडच्या इयान बॉथमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 22 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.





