नागपुर – श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धेमध्ये छत्रपती केसरी व मानाची गदा महाराष्ट्र केसरी पै. बाला रफीक याने पटकावली. पै. बाला रफीकने बंटीकुमार यास पराभूत करत मानाच्या मानाची गदावर आपले नाव कोरले.
प्रथमच आयोजित स्पर्धेमध्ये विविध राज्यांतून ७० पहिलवान सहभागी झाले होते. शहरामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी गाडगेबाबा चौकातून छत्रपतींच्या पुतळ्याची रथामध्ये ज्ञानाई मुलींचे वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील मुलींनी टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढली.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने शहरातील खंडोबा मैदानावर कुस्त्यांचे आयोजन केले होते. यामध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिलेले एक लाख ५१ रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस व छत्रपती केसरी मानाची गदा महाराष्ट्र केसरी पै. बाला रफीक याने पटकाविली. त्याने बंटीकुमार यास पराभूत केले. आमदार मोनिका राजळे यांनी दिलेले एक लाखांचे व्दितीय क्रमांकाचे बक्षीस पै. अनिल लोणारी व पै. मनोज पवार यांना विभागून देण्यात आले.
तृतीय बक्षीस सागर कोल्हे व अक्षय कावरे यांना विभागून देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस शेवगावमधील पै. ऋषिकेश जोशी यास देण्यात आले. त्याने पै. विराज सातारकर यास पराभूत केले. मल्लांबरोबर समालोचक व पंचांनी ही प्रमुख पाहुणे, आयोजक व ग्रामस्थांनी भरभरून बक्षिसे दिले. समालोचक राजेंद्र देवकाते व दीपक कुसळकर यांनी केले. पंच म्हणून संभाजी निकाळजे व गणेश दसपुते यांनी काम पाहिले.