धक्कादायक! २ वर्षांच्या चिमुकलीला करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग

मेरठ – देशात कोविड-19 च्या सक्रिय रूग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने घट दिसून येत आहे. अशातच करोनाच्या नव्या स्ट्रेनने सर्वांचेच टेन्शन वाढवले आहे. युरोपीय देशांमधून आलेल्या काही नागरिकांचे रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन वर्षांच्या चिमुकलीमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे.

माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मेरठ येथे ब्रिटनमधून आलेल्या एक कुटुंबाची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याचे नमुने दिल्लीला तपासणीसाठी दिले असता ४ जणांच्या कुटुंबातील दोन  वर्षीय चिमुकलीला नव्या करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून हे कुटुंब राहात असलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

दरम्यान, २५  नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात भारतात एकूण ३३ हजार नागरिक युरोपीय देशांमधून भारतात परतले आहेत. त्यापैकी ११४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांचे नमुने भारतातील वेगवेगळ्या प्रयोग शाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

चिंताजनक! भारतात नव्या स्ट्रेनची एन्ट्री; ब्रिटनहून परतलेल्या 6 प्रवाशांना बाधा

टेन्शन वाढलं; ब्रिटनहून आलेले 300 प्रवासी ‘नॉट रिचेबल’

करोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे आहेत भयानक ; वाचा सविस्तर…

ब्रिटनवरून आलेल्या “पॉझिटिव्ह’ रुग्णांचे जिनॉम सिक्‍वेन्स तपासणार

जगाची चिंता वाढली ; करोनाचा नवा स्ट्रेन १६ देशांमध्ये पोहोचला

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.