करोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे आहेत भयानक ; वाचा सविस्तर…

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या विषाणूचे ब्रिटनमध्ये संक्रमण वेगाने होत असल्याने जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये हे संक्रमण वेगाने वाढत असल्याने सावध राहण्याचा इशाराही शास्रज्ञांनी दिला आहे. दरम्यान भारतामध्येही कोरोनाच्या नव्या प्रकाराचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमधून परत आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं सापडली आहेत.

चिंताजनक! भारतात नव्या स्ट्रेनची एन्ट्री; ब्रिटनहून परतलेल्या 6 प्रवाशांना बाधा

काय आहेत नव्या विषाणूची लक्षणं?
कोव्हिड-19 च्या नव्या विषाणूची दररोज नवनवी लक्षणंही सापडत आहेत. त्यामुळे सावध राहणं प्रचंड गरजेचं आहे.  यापैकी काही सामायिक लक्षणं अशी आहेत की- ताप येणं, कोरडा खोकला, घसा कोरडा पडणं, सर्दीमुळे नाक वाहत राहणं किंवा नाक चोंदलेलं राहणं, धाप लागणं आणि छातीत दुखणं, थकवा येणं, गॅस्ट्रोइंटेस्टनल इन्फेक्शन, तोंडाची चव जाणं आणि वास न येणं ही महत्त्वाची लक्षणं आहेत अशी लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

पुणेकरांची चिंता वाढली; ब्रिटनमधून आलेले 109 प्रवासी ‘नॉट रीचेबल’

नवा कोव्हिड-19 विषाणू आहे काय नेमका?
कोव्हिड-19 च्या नव्या विषाणूला ‘VUI 202012/01’ हे नाव देण्यात आलं आहे. स्पाइक प्रोटीनमध्ये जेनेटिक म्युटेशन होऊन हा विषाणू तयार झाल्यामुळे तो लोकांमध्ये सहजपणे पसरेल अशी शक्यता या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोव्हिड-19 च्या नव्या विषाणूची धोकादायक लक्षणं
नव्या विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे त्यामुळे त्याच्या लक्षणांपासून सावध रहायला हवं. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनने एकूण लक्षणांपैकी 5 महत्त्वाची धोकादायक लक्षणं जाहीर केली आहेत. यामध्ये महत्त्वाच्या लक्षणांमध्ये चेहरा आणि ओठ निळे पडणे याचा देखील समावेश आहे. इतर लक्षणांमध्ये श्वसनास त्रास होणं, गोंधळ उडणं, सतत छातीत दुखणं, प्रचंड अशक्तपणा आणि जागं राहणं कठीण वाटणं इ. आहेत.  ही पाच लक्षणं महत्त्वाची असून तशी लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.