जगाची चिंता वाढली ; करोनाचा नवा स्ट्रेन १६ देशांमध्ये पोहोचला

लंडन : जगात थैमान घालणाऱ्या करोनाने आता आपले रूप बदलत नव्या विषाणूत प्रवेश केला असल्याचे समोर आले आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाचा नवा विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जगात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन जगातील १६ देशांमध्ये पोहोचला आहे.

कोरोना स्ट्रेनचे दोन नवे विषाणू सापडल्यामुळे सर्वांच्या चिंतेत वाढ होते तोच कोरोनाचा आणखी दुसरा प्रकारही ब्रिटनमध्ये आढळून आला. अखेर त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तोपर्यंत नव्या स्ट्रेनचा हा व्हायरस जगातील १६ देशांमध्ये पोहोचला आहे.

ब्रिटनसह स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झरलंड, डेन्मार्क, नेदरलँड्स, जर्मनी या देशात पोहोचलाय. नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण सप्टेंबरमध्ये आढळून आला होता. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी डिसेंबरमध्ये ब्रिटनध्ये लॉकडाऊन घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर ब्रिटनहून विविध देशांत गेलेल्या अनेकांना या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले. आफ्रिकेतून प्रवास करुन आलेल्या प्रवाशांतून हा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका या देशातील विमान सेवा बंद करण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले. ब्रिटनमध्ये तीन नवे कोरोना व्हायरस सापडलेत. या प्रकारचा व्हायरसचा प्रसार वेगाने होत असल्याची माहिती समोर आली. तसेच तो अत्यंत घातक असल्याने चिंतेत भर पडली आहे. नवा स्ट्रेन सापडल्यानंतर चिंता व्यक्त होत होती. त्यात अधिक भर पडलेली दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.