“जलेबी’ आणि “फ्रायडे’सारख्या चित्रपटात दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी लवकरच अभिनेता अर्जुन रामपालसोबत “भीमा कोरेगाव’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील तिची भूमिका, लुक आणि अनुभव सांगत आपल्या आगामी प्रोजेक्टस्चीही तिने माहिती दिली.
View this post on Instagram
दिगांगना म्हणाली, “भीमा कोरेगाव’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाचा एक भाग असल्याचा मला आनंद असून माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात मला चांगले पात्र साकारण्यास मिळाले आहे.
View this post on Instagram
ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आपल्या लूकविषयी ती म्हणाली, मी सेटवर साधा मेक-अप करून गेली होती. तेव्हा आमचे दिग्दर्शक रमेश थेटे म्हणाले की, ती जशी आहेस, तशीच दिसली पाहिजे.
View this post on Instagram
यामुळे जे काही लाइट मेकअप केला आहे तो काढून टाका. यामुळे असे म्हटले जाऊ शकते की “नो मेकअप काइंड ऑफ लुक’ वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास या चित्रपटाशिवाय दिगांगनाकडे अनेक चित्रपट असून आपल्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत ती म्हणाली की, सध्या अनेक गोष्टींवर काम चालू असून त्यावर इतक्यातच काही सांगता येणार नाही.