टेन्शन वाढलं; ब्रिटनहून आलेले 300 प्रवासी ‘नॉट रिचेबल’

बंगळूर – कर्नाटकमध्ये ब्रिटनहून आलेले अनेक प्रवासी नॉट रिचेलब झाले आहेत. ते करोनाविषयक चाचण्यांसाठी पुढे न आल्यास पोलीस कारवाईचा इशारा त्या राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.के.सुधाकर यांनी दिला आहे.

ब्रिटनमध्ये नुकताच करोना विषाणूचा नवा अवतार आढळला. त्यामुळे अलिकडच्या काळात त्या देशातून भारतात दाखल झालेल्या प्रवाशांची चाचण्यांसाठी शोधाशोध सुरू झाली आहे. त्याला कर्नाटकही अपवाद ठरलेला नाही. त्या राज्यात मागील काही दिवसांत सुमारे 2 हजार प्रवासी ब्रिटनमधून आले.

त्यातील 1 हजार 614 जणांच्या करोनाविषयक चाचण्या झाल्या. त्यामध्ये 26 जण करोनाबाधित आढळले. इतर सुमारे 300 जणांचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. त्यांचे मोबाईल फोनही बंद असल्याचे समजते. त्यामुळे कर्नाटकमधील आरोग्य यंत्रणांचे टेन्शन वाढले आहे.

त्यापार्श्‍वभूमीवर, सुधाकर यांनी ब्रिटनहून दाखल झालेल्यांना सहकार्याचे आवाहन करतानाच इशाराही दिला. संबंधितांनी चाचण्यांना सामोरे जावे. सहकार्य न करणे हा एकप्रकारे गुन्हाच आहे, असे त्यांनी म्हटले. ब्रिटनमध्ये करोनाचा नवा अवतार समोर आल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.