बॉलिवूड अभिनेत्री लिसा रेने स्वत:ला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन ती वर्षभर शिकायला मिळालेल्या सर्व गोष्टींचा विचार करू शकेल. या निर्णयाविषयी अभिनेत्रीने ट्विट करत सांगितले की, हा एक सेक्रेड रिफ्लेक्शन म्हणजेच “पवित्र प्रतिबिंब’चा काळ आहे. लिसाने ट्वीट केले की, सध्याच्या वातावरण आणि हंगामाचे सौंदर्य सर्वांनी अनुभवावे, असे मला वाटते. तसेच त्याने दिलेले इशारे समजून घ्यावे.
या विचारांसह मी आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देत आहे. एका “पवित्र प्रतिबिंब’साठी वेळ काढत असून पुढच्या वर्षी मी परत ऑनलाइन येणार आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास लीझा अखेरच्या वेळी “फोर मोर शॉर्टस’च्या दुसऱ्या सीजनमध्ये झळकली होती.
यात तिच्यासोब कृति कुल्हारी, मानवी गागरू, सयानी गुप्ता आणि बानी जे. आदी कलाकारांनी निर्णायक भूमिका साकारल्या होत्या. या शोला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच कलाकारांच्या परफॉर्मेंसही चाहत्यांना आवडला होता. या शोचा तिसरा सीजन लवकरच येणार आहे. परंतु लीझा या आगामी हंगामात भाग घेणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.