पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्ता मिळून एकूण 26 कोटी 94 लाख 69 हजार रुपयांची मालमत्ता आहे, तर पत्नीकडे 11 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता आहे.
आढळराव पाटील यांच्यावर 1 कोटी 51 लाख रुपयांचे कर्ज आहे. आढळराव पाटील यांच्या कुटुंबीयांकडे एकून 39 कोटी 68 लाख रुपयांची मालमत्ता आहे. उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्रात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.
मालमत्तेचा तपशील
* वार्षिक उत्पन्न – 80 लाख रुपये
* व्यवसाय – भाडे, पगार, व्यवसाय
* जंगम मालमत्ता – 12 क़ोटी
(मुदत ठेवी, शेअर्स, गुंतवणूक, सोने 1 हजार 513 ग्रॅम, हिरे, चांदी तीन किलो)
* स्थावर मालमत्ता -27 कोटी 67 लाख
(शेतजमीन -चिंचोली, शेवाळवाडी-लांडेवाडी. तर मुंबई येथील घाटकोपर, विक्रोळी आणि शिवाजीनगर येथे एकूण पाच मिळकती)
* वाहने – बोलेरो, स्विफ्ट
* कर्जे – 1 कोटी 51लाख