करोना व्हायरसमुळे शोएब अख्तर चीनवर संतापला

नवी दिल्ली – करोना विषाणूंमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. कित्येक देशांमध्ये होत असलेल्या मानाच्या स्पर्धांच्या वेळापत्रकात बदल झाले आहेत. हा कोणाचा दोष आहे, एकट्या चीनने आपल्या या विक्षिप्त खाद्य सवयीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. काही खेळाडूंच्या कारकिर्दीवर त्यामुळे परिणाम होत आहे. केवळ खेळाडूच कशाला या स्पर्धांच्या आयोजनासाठी दिवसरात्र मेहनत करत कुटुंब चालविणाऱ्यांचे तर हाल सुरू झाले आहेत. या सगळ्याला एकटा चीन जबाबदार आहे. आपल्या आहारात वटवाघुळ, मांजर, रातकिडे हे असले प्रकार कोणी खाते का, असा संतप्त सवाल शोएबने केला आहे.

प्रत्येक व्यक्‍त आपल्या आवडीचे अन्न खातात, पण वटवाघुळ, कुत्री, मांजर हे असले कसलेही अन्न चिनी लोक खातात. याच विक्षिप्त सवयीमुळे आज संपूर्ण जगात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याच धोक्‍यामुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्राला खीळ बसली आहे.

पाकिस्तानात तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होत नव्हते. आता या धोक्‍यामुळे यापुढेही पाकिस्तानात क्रिकेटच काय कोणत्याही क्रीडा स्पर्धा होणार नाहीत, हे खूपच क्‍लेशदायक आहे. आता पुढील काळात तरी चिनी लोक यातून बोध घेतील अशी अपेक्षा आहे, असेही शोएबने व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.