शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची आजची सभा उद्या होणार

गोंदवले (प्रतिनिधी ) – माण-खटाव विधानसभेच्या निवडणूकी निमित्त शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी 10 वाजता दहिवडी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार होती. परंतू खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण मुंबईतून न होवू शकल्याने ते दहिवडी येथे पोहोचू न शकल्याने त्यांची आज होणारी सभा रद्द झाली.

आज सकाळी माण येथील इंगळे मैदानावर शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार होती. दरम्यान, आज सकाळी उद्धव ठाकरे मुंबई येथून हेलिकॉप्टरद्वारे दहिवडीकडे प्रयाण करणार होते. मात्र, मुंबई येथील खराब हवामानामुळे उद्धव यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण होवू शकले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे निर्धारित वेळेत सभेसाठी दहिवडीत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या भ्रमणध्वनीवरुन सभेसाठी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले.

खराब हवामानामुळे उध्दव ठाकरे यांची दहिवडी येतील सभा रद्द झाली आहे. या सभेस उपस्थित असलेल्या लोकांना स्वतः उध्दव ठाकरे यांनी फोन वरून मार्गदर्शन करत नाराज होऊ नका मी उद्या सकाळी दहा वाजता आपल्या भेटीला नक्की येणार आहे. तसेच माझ्या न येण्याचा कोणी ही वेगळा अर्थ काढू नका.

उध्दव ठाकरे कधी कोणा बरोबर सेटिंग करत नाही आपले अधिकृत उमेदवा शेखर गोरे हेच असून यांना आपण आमदार करायचं आहे असे जनसमुदायाला म्हटले. दरम्यान, शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांनीही उद्याच्या सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही माण-खटावच्या मतदारांना केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)