sharad pawar। ही केवळ अफवा आहे आणि ती कुणी पसरवली याचा शोध पत्रकारांनी घ्यावा असा म्हणत शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहे. आज सकाळी पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक झाली.
या बैठकीदरम्यान अशा अशा चर्चांना सुरुवात झाली की, शरद पवार गट लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होणार ? या चर्चांवर शरद पवार गटाचे नेते, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्या आदेशाने पक्षाची भूमिका मांडली आहे.
प्रशांत जगताप म्हणाले,’आज सकाळी बैठकीत सुप्रिम कोर्टाच्या निकालावर चर्चा झाली. शरद पवार गटाचे काँग्रेस मध्ये विलीगीकरण होणार नाही. ते पुढे म्हणाले ज्यांना पवार साहेब यांची भीती आहे ते अफवा पसरवून मोकळे झाले, तसेच या बैठकीत येत्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजना बाबत चर्चा करण्यात आहे.
‘पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू असतांना नेते मंगलदास बांदल यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चाना दुजोरा दिला आहे. यावर प्रशांत जगताप पुढे म्हणाले, ते शरद पवार गटाचे नेते नाही.’