junaid khan sai pallavi । अभिनेता आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आदित्य चोप्राच्या ‘महाराज’ चित्रपटातून तो अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करत आहे. हा चित्रपट 2024 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
पहिल्या चित्रपटासोबतच तो त्याच्या दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत साऊथ अभिनेत्री साईपल्लवी दिसणार आहे. चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले, ज्यामध्ये दोघे एकत्र दिसत आहे.
जपानमधील सपोरो स्नो फेस्टिव्हलदरम्यान या चित्रपटाच्या शूटिंगची फोटो घेण्यात आली आहे. फोटोंमध्ये जुनैद गडद तपकिरी लोकरीचा कोट, कानातले आणि चष्मा घातलेला दिसत आहे. तर साईने ब्लॅक चेक प्रिंट वुलन कोट घातला आहे. फोटोंमध्ये दोघेही व्यस्त दिसत आहे.
या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी केले, हा रोमँटिक ड्रामा चित्रपट असणार आहे, ज्यामध्ये आमिरचा मुलगा साऊथ अभिनेत्री सई पल्लवीच्या प्रेमात दिसणार आहे.
जुनैदच्या ‘महाराज’ या डेब्यू चित्रपटाबद्दल सांगायचे तर हा चित्रपट 1862 च्या कुख्यात महाराजा लिबेल केसच्या कथेवर आधारित आहे. रिपोर्ट्सनुसार, जुनैद या चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे, जो कोर्टरूम ड्रामाच्या विरोधात आहे.