Arjun Kapoor : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजयसह या चित्रपटात बॉलीवूडची एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट आहे. अक्षय कुमार, दीपिका पदुकोन, रणवीर सिंग यानंतर आता या चित्रपटात अर्जुन कपूरची एंट्री झाली आहे. नुकतेच या चित्रपटातील अर्जुनचा जबरदस्त लुक समोर आला आहे.
‘सिंघम अगेन’ मध्ये अर्जुन कपूर खलनायकाची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमध्ये अर्जुनच्या चेहऱ्यावर रक्त, केस वाढलेले दिसत आहे. याशिवाय अर्जुन आणि रणवीर सिंग आमनेसामने आल्याचं पाहायला मिळते. ‘इन्सान गलती करता है और उसे सजा भी मिलती है, लेकिन अब जो आएगा वै शैतान है’, असं कॅप्शन अर्जुनच्या पोस्टरला देण्यात आले आहे. सध्या त्याचा हा लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांना त्याचा हा लुक पसंतीस पडला आहे.
View this post on Instagram
‘सिंघम अगेन’ सिनेमात टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करिना कपूर दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे.रोहित शेट्टीचे ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर सिंघम अगेनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या लुकनंतर अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा:
Singham Again: खिलाडी कुमारची ‘सिंघम अगेन’मध्ये दमदार एन्ट्री; फर्स्ट लुक समोर