शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्याबद्दल एक रंजक गोष्ट समोर आली आहे. बॉलीवूडच्या या पॉवर कपलने एकदा नव्हे, तर तीनदा लग्न केले आहे. शाहरुख खान आणि गौरी खान यांचे पहिले लग्न कोर्टात झाले होते. यानंतर 26 ऑगस्ट 1991 रोजी दोघांचे लग्न झाले. यानंतर 25 ऑक्टोबर 1991 रोजी दोघांचे लग्न हिंदू रीतीरिवाजांशी झाले. अशाप्रकारे शाहरुख खान आणि गौरी यांना तीनदा लग्न करावे लागले. गौरी पंजाबी कुटुंबातील असून शाहरुख खान मुस्लीम कुटुंबातील आहे. त्यामुळे प्रथानुसार दोघांचे लग्न झाले.
शाहरुख खान आणि गौरी खान हे दोघेही दिल्लीचे रहिवासी आहेत. शाहरुख खानचे शालेय शिक्षण सेंट कोलंबस स्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेज हंसराजमध्ये झाले. शाहरुख खान हा फुटबॉल आणि हॉकी चांगला खेळत असे. पण खांद्याला दुखापतीमुळे तो खेळात आपले करिअर करू शकला नाही. पण कॉलेजच्या दिवसापासूनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली की तो आज बॉलीवूडचा किंग खान बनला आहे.
गौरी खानबद्दल सांगायचे झाल्यास तिचे वडील कर्नल रमेशचंद्र छिब्बर होते. तिने बारावीचे शिक्षण दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून पूर्ण केले. यानंतर लेडी श्री राम कॉलेजमध्यून बीएम ऑनर्स पूर्ण केले. तिने सहा महिन्यांचा फॅशन डिझायनिंग कोर्सही केला आहे. शाहरुख खान आणि गौरी यांनी सहा वर्षे डेटिंगनंतर लग्न केले.