पुणे : डेक्कन जिमखाना समोरील एका हॉटेल मध्ये शुक्रवारी आग लागल्याची घटना घडली. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर तीन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट हॉटेल बाहेर पडत होते.
अग्निशामक दलाच्या जवानांनी काही मिनिटात ही आग आटोक्यात आणली. लॉकडाऊन असताना हॉटेल कसे सुरू होते याबाबत आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.