सध्या यूट्युबवर “मसक्कली 2.0′ हे गाणे ट्रेडिंग आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया या दोघांनी परफॉरमन्स दिला आहे. पण हे गाण सोशल मीडियावर फार ट्रोल होत आहे. “मसक्कली’ हे मूळ गाण “दिल्ली-6′ या चित्रपटातील असून यात अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर हे कलाकार दिसले आहे. या गाण्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. त्यामुळे त्याचा रिमेक करणं अनेकांना पटलेले नाही आहे. मुळ गाण्याची गंमत या रिमेकमध्ये राहिलिच नसल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केली आहे.
या गाण्याचे संगीतकार ए. आर. रेहमान यांना देखील गाण्याचा रिमेक फारसा काही रुचलेला दिसत नाही आहे. त्यांनी ट्वीट करून संताप व्यक्त केला आहे. ए.आर. रेहमान यांनी ट्वीट करून मूळ गाणं एन्जॉय करण्याचा सल्ला दिला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘आम्ही या गाण्यासाठी कोणतेही शॉर्टकट घेतले नाही. पुन्हा-पुन्हा गाणं लिहून, 200 हून अधिक संगीतकारांशी चर्चा करून, अनेक रात्र जागून आणि 365 दिवस यावर काम करून असं गाणं तयार केले. जे पिढ्यानपिढ्या अजरामर राहू शकेलं.’ अशाप्रकारे रेहमान यांनी मूळ गाणं पाहण्याचा संदेश दिला आहे आणि नवीन गाण्याबाबत संताप व्यक्त केला आहे.