IPL 2024 (GT vs CSK Match 59, Playing XI) : आज, IPL 2024 च्या 59 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. गुजरातसाठी हा नॉकआऊट सामना आहे. जर संघ हरला तर तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल. त्याचबरोबर विजयासह आशाही कायम राहतील. तीच स्थिती चेन्नईची आहे. त्यांच्यासाठीही विजय महत्त्वाचा आहे, पण पराभवामुळे त्यांचा मार्ग कठीण होईल.
तत्पूर्वी, चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोसमात ऋतुराजने नाणेफेक जिंकण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. त्याला 12 पैकी 10 वेळा नाणेफेकमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
चेन्नई संघात एक व मोठा बदल झाला आहे. रिचर्ड ग्लीसनच्या जागी रचिन रवींद्रने संघात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर गुजरातने संघात दोन बदल केले आहेत. कार्तिक त्यागीला मॅथ्यू वेडच्या जागी तर रिद्धिमान साहाच्या जागी जोशुआ लिटलचा संघात समावेश करण्यात आला आहे. गुजरातसाठी वेगवान गोलंदाज कार्तिकचा हा पदार्पणाचा सामना आहे. याआधी तो सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे.
🚨 Toss 🚨@ChennaiIPL win the toss and elect to bowl against @gujarat_titans
Follow the Match ▶️ https://t.co/PBZfdYswwj#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/UewTAubgeb
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2024
GT vs CSK : दोन्ही संघांची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक (इम्पॅक्ट सब : अभिनव मनोहर, संदीप वॉरियर , बी.आर.शरथ, दर्शन नळकांडे, जयंत यादव)
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग. (इम्पॅक्ट सब : अजिंक्य रहाणे, शेख रशीद, अरावेली अवनीश, समीर रिझवी, मुकेश चौधरी.)
कोलकाता संघ सध्या 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी राजस्थानचेही तेवढेच गुण आहेत, मात्र हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स संघ 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी चेन्नई, दिल्ली आणि लखनौचे 12-12 गुण आहेत. बेंगळुरू संघ 10 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. अशा स्थितीत प्ले ऑफची लढत रोमांचक बनली आहे.
आतापर्यंत 11 सामन्यांत 12 गुण घेतलेल्या ऋतुराज गायकवाडच्या संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. प्लेऑफमधील संघाचे स्थान अद्याप सुरक्षित नाही. पराभवाचा संघाच्या पुढील वाटचालीवर परिणाम होईल. गुजरात टायटन्सने 11 सामने खेळले असून, 4 जिंकले आहेत आणि 7 सामने गमावले आहेत. संघ दहाव्या क्रमांकावर आहे. गुजरातसाठी हा नॉकआऊट सामना आहे. जर संघ हरला तर तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल. त्याचबरोबर विजयासह आशाही कायम राहतील.