IPL 2024 (Virat Kohli,RCB) : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) स्टार फलंदाज विराट कोहलीने पंजाब किंग्जविरुद्ध शानदार फलंदाजी केली. कोहली 47 चेंडूंत सात चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 92 धावा करून बाद झाला. त्याच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने पंजाबसमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले. यासोबतच कोहलीने आयपीएल 2024 मध्ये 600 धावाही पूर्ण केल्या आहेत. इतकेच नव्हे तर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोहली आघाडीवर आहे.
या सामन्यात कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आपल्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर तीन संघाविरूद्द 1 हजारपेक्षा अधिक धावा करण्याचा तसेच आयपीएलच्या एका मोसमात चौथ्यांदा 600 हून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे
1. आपल्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोहलीने पंजाब किंग्जविरुद्ध 1000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रमही केला. कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये तीन संघांविरुद्ध 1 हजारांहून अधिक (1000+) धावा केल्या आहेत. पंजाब व्यतिरिक्त कोहलीने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही एक हजारहून अधिक धावा पूर्ण केल्या आहेत.
Milestone Maverick has entered the chat.
1000 runs against another IPL team. ❤️🔥#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #PBKSvRCB pic.twitter.com/cmUlb7P4Pc
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 9, 2024
यासह कोहलीच्या नावावर सर्वाधिक संघांविरुद्ध 1000+ धावा करण्याचा विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने या प्रकरणात रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले. रोहितने दिल्ली आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध 1000+ धावा केल्या आहेत, तर वॉर्नरने केकेआर आणि पंजाब किंग्ज विरुद्ध 1000+ धावा केल्या आहेत.
2. तसेच कोहलीने आयपीएलच्या एका मोसमात चौथ्यांदा 600 हून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला. कोहलीच्या नावे या हंगामात 12 सामन्यात 634 धावांची नोंद झालेली आहे. या बाबतीत त्याने लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलची बरोबरी केली आहे. राहुल आणि कोहलीने आयपीएलमध्ये प्रत्येकी चार वेळा 600 हून अधिक धावा केल्या आहेत. हे दोन्ही फलंदाज असे फलंदाज आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 600 हून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय, RCB कडून खेळलेला ख्रिस गेल आणि सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा डेव्हिड वॉर्नर यांनी प्रत्येकी तीनदा IPL मध्ये 600 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याचवेळी आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने दोनदा अशी कामगिरी केली आहे.