shehnaaz gill – बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेल्या शहनाज कौर गिलने या वर्षी 2023 मध्ये तिने बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली, तिने यावर्षी एप्रिलमध्ये सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने थँक यू फॉर कमिंग या चित्रपटात भूमी पेडणेकर, शिबानी बेदी, डॉली सिंग आणि कुशा कपिलासोबत स्क्रीन शेअर केली.
जरी या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली तरी या या चित्रपटातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. नुकतेच तिने आपल्या करिअरबद्दल सांगितले.
शहनाज कौर गिलने सांगितले की, २०२३ हे वर्ष माझ्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. या वर्षात जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. मी आता जरा जास्त मॅच्युअर झाले, पूर्वी मी खूप बालिश असायचे. काही परिस्थितींना कसे हाताळायचे आणि कसे हाताळायचे नाही हे मला कळत.
शहनाज पुढे म्हणाली, ‘मला सर्व सुपरस्टार्ससोबत काम करायचे आहे, पण जर मी कोणाचा विचार केला तर तो रणबीर कपूर असेल. मी त्याला कधीच प्रत्यक्ष भेटले नाही, पण कार्यक्रमांमध्ये मी त्याला दुरून पाहिले आहे. असं म्हणत तिने इच्छा व्यक्त केली.