दिव्यांगांच्या मदतीसाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष

पुणे – महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, गोरगरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांना संचारबंदीत स्वयंसेवी संस्थांमार्फत मदत मिळावी, यासाठी महापालिका भवनात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

लॉकडाउनमुळे शहरातील दिव्यांग व्यक्ती, गोरगरीब आणि गरजू नागरिक, ज्येष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. त्यांना अन्न, औषधे घरपोच मिळण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी मदत करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले होते. या लोकांना अन्न आणि औषधे देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना ते देता यावे, यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. मदत करू इच्छिणाऱ्या आणि मदत हवी असणाऱ्यांनी कक्षातील 020-25501285 या फोन नंबरवर सकाळी 10 ते सायं. 6 पर्यंत संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आवाहन
ज्या संस्था, व्यक्ती, यांना सेवाभावी तत्वावर वरीलप्रमाणे किट स्वरूपात मदत करावयाची आहे, त्यांनी
श्रीनिवास बोनाला
मुख्य नोडल अधिकारी तथा
मुख्य अभियंता प्रकल्प विभाग
मोबाइल – 9689931380
रामदास चव्हाण
समाजविकास अधिकारी
मोबाइल – 9689931479
या क्रमांकावर संपर्क साधावा.

गरिबांना दिली जाणारी मदत
गव्हाचे पीठ 5 किलो, तांदूळ 5 किलो, डाळ 1 किलो, गोडे तेल 1 लिटर, मीठ 1 किलो, हळद 100 ग्रॅम, तिखट 250 ग्रॅम, अंगाचा साबण 1, कपडे धुण्याचा साबण 1.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.