पुणे : सार्वजनिक वाहतूकीच्या सक्षमीकरणासह, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच शासकीय सुविधा, युवक व महिल्यांच्या सुरक्षेसाठी कायदा सुव्यवस्थेवर भर तसेच विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यासाठी आयआयएम व आयआयटी सारख्या संस्थासाठी केंद्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करणारी आश्वासने असलेला
’ पुण्यासाठी धंगेकरचा शब्द..!’ देणारा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी, इंडीया फ्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा जाहीरनामा प्रकाशन सोमवारी काँग्रेस भवनमध्ये डॉ. शशी थरुर यांच्या हस्ते करण्यात आले.
सार्वजनिक वाहतूक, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सांस्कृतिक आणि पर्यटन, श्रमिक आणि असंघटित कामकार या घटकांचा जाहीरनाम्यात समावेश असल्याचे धंगेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले..
काय दिला आहे पुणेकरांना शब्द ..
– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणार
– आरक्षित जागांवर बहुमजली पार्किंग उभारणार
-ज्येष्ठ नागरिकांना घरपोच आरोग्य सेवा
– ज्येष्ठांना औषदात सवलतीसाठी प्रयत्न करणार
– शहर ड्रग्समुक्त करणार, महिला सुरक्षेसाठी प्रयत्न करणार
– प्रत्येक प्रभागात मोहल्ला क्लिनिक सुरू करणार
– प्रत्येक मतदारसंघात प्रसूतीकेंद्र उभारणार
– आय आय एम. आ आय टीसाठी प्रयत्न करणार
-मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी प्रयत्न करणार
– शहराला पर्यटनाचे केंद्र बनविणार
– चारही दिशांना क्रीडा संकुल उभारणार
– पुण्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार
– घरेलू कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
– रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापण करणार
– पाणी पुरवठा, जलनिस्सा:रण योजना पुर्ण करणार
– स्पर्धा परिक्षासाठी मोफ अभ्यासिकांची सुविधा