पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्यानंतर रविवारी रात्री 9 वाजून 9 मिनिटांपर्यत देशभरात करोनाविरोधात सर्वजण एकत्रित लढा देवू असे चित्र निर्माण झाले होते. लॉकलाडनच्या काळात नागरिकांनी आप-आपल्या घराच्या बालकनींमध्ये मेणबत्ती आणि दिवे पेटविले होते. याप्रसंगी अभिनेत्री कतरीना कैफने सुद्धा आपली बहिण इसाबेलसोबत मेणबत्ती लावत करोनाविरोधात एकजुटीचा संदेश दिला.
तसेच कतरीना कैफचा मित्र आणि “उरी’ फेम विकी कौशलनेही आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील फोटोमध्ये त्याच्या घरात “आशेचा दिवा’ पेटविण्यात आल्याचे दिसत आहे. विकी कौशलने या फोटोसह एक कॅप्शन दिली लिहिले आहे की, ऐक्य, एकता आणि आपल्या सर्वांसाठी!.
दुसरीकडे कतरीना कैफनेही याप्रसंगी घराच्या बालकनीत पेटवलेली मेणबत्ती घेवून उभी असल्याचे दिसून आहे. तिच्यासोबत तिची बहिण ईसाबेलही होती. कतरिनाने दोन फोटो पोस्ट केले आहेत. यासह कॅप्शन दिली की, “आशा आहे की जेव्हा सर्व प्रकाश नाहीशी होईल, तर तुमच्या आयुष्यात ते उजळेल.’